विजय हजारे चषक: महाराष्ट्राचा पंजाब वर दणदणीत विजय 

नाशिकच्या सत्यजित बच्छाव चे पाच बळी

Newslantern Sports Desk

नाशिक: बीसीसीआयच्या वतीने सुरू असलेल्या विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत मध्ये नाशिकच्या सत्यजित बच्छावच्या भेदक गोलंदाजी मुळे महाराष्ट्र संघाने पंजाब वर ९४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाने अंकित बावणेच्या नाबाद शतकाच्या जोरावर ५० षटकात ५ बाद २८१ धावा केल्या, त्यास नौशाद शेख ६० धावा करत उत्कृष्ट साथ दिली.

उत्तरादाखल महिना मैदानात उतरलेला पंजाब संघ सत्यजित बच्छावच्या भेदक गोलंदाजी पुढे 187 धावा मध्ये गारद झाला.
सत्यजितने उत्कृष्ट गोलंदाजी करत ९.३ षटकात ५ गडी बाद केले.

महाराष्ट्र संघाने आपल्या आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये गोवा व कर्नाटक या संघांवर विजय मिळवला आहे सत्यजितने गवा संघासमोर उत्कृष्ट गोलंदाजी करत एक गडी बाद केला आहे त्याचप्रमाणे कर्नाटक संघाचे दोन गडी बाद केले सत्यजित च्या असलेल्या फॉर्मुळे फॉर्ममुळे महाराष्ट्र संघ निश्चितच चांगली कामगिरी करेल त्याचप्रमाणे अंकित बावणे जोरदार फलंदाजी करत आहे सत्यजित बच्छावच्या उत्कृष्ट कामगिरीचा नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन धनपाल शहा, सेक्रेटरी समीर रकटे व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!

Signup to receive latest news in your inbox!

Send this to a friend