निरीक्षण व बालगृह केंद्रास वोक्हार्ट द्वारे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन भेट

Newslantern Lifestyle Desk

नाशिक: गेल्या एक दशकापासून आरोग्य व सामाजिक बांधिलकीतून नाशिकशी नाव जोडलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे उंटवाडी रोड वरील निरीक्षण व बालगृह येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसविण्यात आले. यानिमित्ताने एक कार्यक्रम एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास वोक्हार्ट नाशिकचे केंद्रप्रमुख विनोद सावंतवाडकर, विपणन प्रमुख अभिषेक शर्मा, स्त्रीरोग तज्ञ डॉ वैशाली अग्रवाल व निरीक्षण व बालगृहाचे मानद सचिव चंदुलाल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलतांना विनोद सावंतवाडकर म्हणाले की, विविध सामाजिक उपक्रमाद्वारे वोक्हार्ट नेहमीच नाशिककरांसोबत असते. निरीक्षण गृहातील मुलींना या मशिन मुळे सुविधा होणार असून पुढील एका वर्षासाठी सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा देखील वोक्हार्ट द्वारे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मानद सचिव चंदुलाल शहा यांनी संस्थेची माहिती दिली यानंतर आयोजित सत्रात स्त्रीरोग तज्ञ डॉ वैशाली अग्रवाल यांनी उपस्थित विद्यार्थीनीना मासिक पाळी, स्त्री आरोग्य, स्त्रियांची प्रजनन पद्धती यावर माहिती देऊन त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!

Signup to receive latest news in your inbox!

Send this to a friend