नाशिकचा परभणीवर निर्विवाद विजय

प्रतीक तिवारीचे सामन्यात १० बळी

Newslantern Sports Desk

नाशिक: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 14 वर्षाखालील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये महात्मानगर क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या नाशिक विरुद्ध परभणी दरम्यानच्या सामन्यामध्ये नाशिकचा साहिल पारेख याच्या ७० धावा व डावखुरा फिरकी गोलंदाज प्रतिक तिवारी च्या १० बळी मुळे नाशिक ने परभणी संघावर निर्विवाद विजय मिळविला.दोन दिवसीय सामन्यामध्ये साहिलने काल केलेल्या ७० धावांच्या जोरावर नाशिक संघाने सर्वबाद १६४ धावा केल्या.आर्यन पालकर ने २४ व हर्ष सिंग ने २५ धावा करत त्यास चांगली साथ दिली. प्रतीक तिवारीच्या भेदक माऱ्यापुढे पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा परभणी संघाने ९ बाद ७८
धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा प्रतीक तिवारीने शेवटचा बळी घेत परभणी चा डाव ७८ धावांवरच गुंडाळला.अरबाज साहा ने उत्कृष्ठ गोलंदाजी करत ३ बळी मिळविले.

दुसऱ्या डावात नाशिक संघाने सर्वबाद ९४ धावा केल्या.परभणी च्या सौरभ शिंदे याने उत्कृष्ठ गोलंदाजी करत ५ बळी मिळविले. शौनक साठे याने ४६ धावा केल्या. विजयासाठी १८५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला परभणी संघ अरबाज साहा च्या ५ बळी व प्रतीक तिवारीच्या ४ बळी या भेदक माऱ्यापुढे दुसऱ्या डावात सर्वगडी बाद १०८ धावा करू शकला.व नाशिक संघाने ७७ धावांनी विजय मिळवत ५ गुण मिळवत तीन सामन्यांत १४ गुण मिळवून सुपरलीग मध्ये प्रवेश मिळविला.

Leave a Reply

error: Content is protected !!

Signup to receive latest news in your inbox!

Send this to a friend