दिलखुलास कार्यक्रमात सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

१२ सप्टेंबर रोजी चिपी विमानतळावर चाचणी उड्डाण

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास’ या विषयावर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सोमवार दि. १० आणि मंगळवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

१२ सप्टेंबर रोजी चिपी विमानतळावर चाचणी उड्डाण करण्यात येणार असून डिसेंबर पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परदेशात आणि परदेशातून सिंधुदुर्गात विमानसेवा सुरु करण्याचा नवा आयाम आहे. देशातील सर्वात स्वच्छ जिल्ह्याची स्वच्छता सातत्याने टिकण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, चांदा ते बांदा योजना, जागतिक स्तरावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी केलेले नियोजन, कॉफीटेबल बुक, न्याहारी योजनेचे बळकटीकरण, कोकण ग्रामीण पर्यटक नावाच्या निधीमधून निवास सबसिडी, मासेमार बांधवांसाठी राबविण्यात येणारे नवीन धोरण, फळबागांचे संवर्धन, फळांच्या शेतीसह जोडधंदे व त्यापासून रोजगार निर्मिती, शेती आणि बागायतीच्या नवीन पद्धतींबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन, कातकरी जमातींच्या उत्थानासाठी व आरोग्यासाठी योजनेबाबतची माहिती डॉ. पांढरपट्टे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!

Signup to receive latest news in your inbox!

Send this to a friend