‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मध्ये सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे

Newslantern Net Desk

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कार्यक्रमात ‘सर्वांगीण विकासाचा ध्यास’ या विषयावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 1 जानेवारी 2019 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. 1 आणि बुधवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 7.25ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

सामाजिक न्याय विभागाचे कामकाज, दुर्बल घटकांसाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी घेतले गेलेले महत्वपूर्ण निर्णय, अनुसूचित जाती, जमाती, मागास प्रवर्गातील व्यक्तींना शासनामार्फत विविध योजनाचा लाभ होण्यासाठी देण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांच्या दर्जात सुधारणा करणे, रक्तातील नात्यांना जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय, देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया यासह सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती श्री. वाघमारे यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!

Signup to receive latest news in your inbox!

Send this to a friend