एस एम बी टी मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेचे हर्षल तांबे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

Newslantern Sports Desk

नाशिक: नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षी ही स्पर्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या एस एम बी टी हॉस्पिटल यांच्यावतीने प्रायोजित करण्यात आलेली आहे.

या स्पर्धेचे उदघाटन एस एम बी टी हॉस्पिटल चे मॅनेजिंग ट्रस्टी हर्षल तांबे व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सिनिअर चेअरमन विलास लोणारी यांच्या हस्ते नाणेफेक करून सप्टेंबर २५ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान , गोल्फ क्लब नाशिक येथे करण्यात आले. यावेळी एस एम बी टी हॉस्पिटल चे मार्केटिंग प्रमुख अनिवेश दुबे, निमा चे सेक्रेटरी तुषार चव्हाण असोसिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे, हेमंत देशपांडे, राजाभाऊ भागवत, प्रफुल्ल शहा, निखिल टिपरी, बंडू दंदणे, आनंद शेट्टी, अनिरुद्ध भांडारकर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी सलग्न जवळजवळ ५० क्लब सहभागी झाले आहे. या स्पर्धेमध्ये खुल्या वयोगटामध्ये एकूण १६ संघ सहभागी होत आहे, त्याचप्रमाणे १९ वर्षाखालील वयोगटात १६ संघांनी , १६ वर्षाखालील वयोगटात १६ संघांनी ,१४ वर्षांखालील वयोगटात २८ संघांनी सहभाग घेतला आहे. तर यावर्षी प्रथमच बारा वर्षाखालील खेळाडूंसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे यामध्ये १६ संघांनी सहभाग घेतला आहे.

वरील सर्व वयोगटामध्ये एकूण १४७ सामने अनंत कान्हेरे मैदान, महात्मा नगर, सिद्ध पिंपरी, सुयोजित, जे एम सी टी कॉलेज या मैदानांवर खेळविले जाणार आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळता यावे यासाठी या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून *ह्या स्पर्धेचे क्रीक हिरोज या क्रिकेट ऍप वर ऑनलाइन स्कोरिंग होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना, प्रशिक्षकांना व पालकांना याद्वारे खेळाडूचे कामगिरीचा आढावा घेता येणार आहे.

एस एम बी टी मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेचे एस एम बी टी हॉस्पिटल चे मॅनेजिंग ट्रस्टी हर्षल तांबे व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सिनिअर चेअरमन विलास लोणारी नाणेफेक करून सप्टेंबर २५ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे उदघाटन करतांना दिसत आहेत. एन डी सी ए सेक्रेटरी समीर रकटे, एस एम बी टी हॉस्पिटल चे मार्केटिंग प्रमुख अनिवेश दुबे, निमा चे सेक्रेटरी तुषार चव्हाण असोसिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे, हेमंत देशपांडे, राजाभाऊ भागवत, प्रफुल्ल शहा, निखिल टिपरी, बंडू दंदणे, आनंद शेट्टी, अनिरुद्ध भांडारकर व अन्य मान्यवर दिसत आहेत.

 

Leave a Reply

error: Content is protected !!

Signup to receive latest news in your inbox!

Send this to a friend